January 3, 2025 8:30 PM | Mahakumbh 2025

printer

महाकुंभ मेळ्याला जाणाऱ्या भाविकांना रेल्वेतिकीट काढण्यासाठी QR कोड जॅकेट

उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथं होणाऱ्या महाकुंभ मेळ्याला जाणाऱ्या भाविकांना QR कोडद्वारे रेल्वेची तिकीटं सुलभतेनं काढता येतील. QR कोड असलेले हिरव्या रंगाचे जॅकेट परिधान केलेले रेल्वे कर्मचारी रेल्वे स्थानकांच्या परिसरात उपलब्ध असतील. त्यावरुन तिकिट काढण्याची सुविधा मिळणार असल्यानं भाविकांचा वेळ वाचेल, असं रेल्वेनं म्हटलं आहे.