प्रवाशांची सुरक्षितता वाढवण्यासाठी रेल्वेनं सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सर्व 74 हजार कोच आणि 15 हजार लोकोमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यास मान्यता दिली आहे.
प्रत्येक रेल्वे कोचमध्ये चार डोम प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे असतील आणि प्रत्येक लोकोमोटिवमध्ये सहा सीसीटीव्ही कॅमेरे असतील. 100 किलोमीटर प्रति तास वेगानं धावणाऱ्या आणि कमी प्रकाशात धावणाऱ्या रेल्वे गाड्यांसाठी देखील उच्च दर्जाचे फुटेज उपलब्ध असावं याची खात्री करण्याचं आवाहनही त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना केलं आहे.