रेल्वेनं प्रवास भाडे आकारणीत बदल केले असून ते मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. यात अनारक्षित किंवा द्वितीय श्रेणीच्या प्रवास भाड्यात पहिल्या 215 किलोमीटर अंतरापर्यंत काहीही बदल झालेला नाही.
या दरवाढीनंतर 500 किलोमीटरचा प्रवास द्वितीय श्रेणीतून करणाऱ्यांचं भाडं 10 रुपयांनी वाढणार आहे. तर वातानुकूलित श्रेणीतल्या प्रवाशांना 20 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. उपनगरी गाड्या आणि मासिक पासच्या दरात काहीही बदल केलेला नाही, असं रेल्वेनं जाहीर केलं आहे.