December 10, 2025 4:51 PM

printer

नाताळ आणि हिवाळी सुट्ट्यांमधे रेल्वेच्या जादा गाड्या

नाताळ, आणि हिवाळी सुट्ट्यांमधे  प्रवाशांची गर्दी लक्षात  घेऊन मध्य रेल्वेनं मुंबई-नागपूर, पुणे-नागपूर, आणि पुणे-अमरावती दरम्यान जादा गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांना शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव या रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

 

मुंबई-नागपूर गाड्या २०डिसेंबर ते ३ जानेवारी या कालावधीत दर शनिवारी, पुणे-नागपूर-पुणे साप्ताहिक विशेष गाडी १९ डिसेंबर ते दोन जानेवारी दरम्यान दर शुक्रवारी आणि शनिवारी तर पुणे-अमरावती-पुणे साप्ताहिक विशेष गाडी २० डिसेंबर ते ०३ जानेवारी दरम्यान दर शनिवारी आणि रविवारी प्रवाशांच्या सेवेत असतील. या गाड्यांचं आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रं तसंच www.irctc.co.in या संकेतस्थळावर करता येईल.