‘रेलवन अ‍ॅप’चं रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज रेल्वेच्या सर्व प्रवासी सेवा एका ठिकाणी उपलब्ध करून देणाऱ्या ‘रेलवन अ‍ॅप’चं उद्घाटन केलं. अनारक्षित तिकीट काढणं, रेल्वेगाड्यांची चौकशी, प्रवास नियोजन, मदत सेवा आणि खानपान सेवा या सेवा या अ‍ॅपवर उपलब्ध आहेत. सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सिस्टिमच्या स्थापना दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात त्यांनी याबद्दल माहिती दिली.

 

रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवाशांच्या सुरक्षेवर भर दिला पाहिजे असं ते म्हणाले. हे अ‍ॅप अ‍ॅन्ड्रॉईड प्लेस्टोअर आणि आयओएस अ‍ॅप स्टोअरवरून डाऊनलोड करता येणार असून त्यासाठी सिंगल साईन इन सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे अनेक पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज नाही.  

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.