मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दावोस दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईतील पहिलं शहर म्हणून रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा केली. नवी मुंबई विमानतळापासून पंधरा ते वीस किलोमीटरवर हे ग्रोथ सेंटर निर्माण करण्यात येणार आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून यासाठीच्या परवानग्या मिळवण्याचा प्रयत्न केला जात होता. त्या मिळाल्यानंतर तिसऱ्या मुंबईतल्या पहिल्या शहराची घोषणा करण्यात येत आहे, अनेक गुंतवणूकदारांनी यात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं
स्वित्झर्लंडमध्ये जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीच्या निमित्ताने करण्यात येणारा दावोस दौरा हा भारतात आणि पर्यायाने महाराष्ट्रात ज्ञान, तंत्रज्ञान आणि विदेशी गुंतवणूक मिळवण्यासाठीचा महत्त्वाचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. दावोस दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी अनेक सामंजस्य करार केले. यात युनिव्हर्सिटी ऑफ कॅलीफोर्निया, युनिव्हर्सिटी ऑफ बर्कले, टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिक, अर्बन फ्युचर्स कलेक्टिव्ह-लंडन, आयसीसीआय-इटली, अँलाँग ट्युनिंग इन्स्टिट्यूट, नॉर्वेजीयन जीओ टेक्निकल इन्स्टिट्यूट, अर्बन प्लॅनिंगमधील सुबाना जुराँग यांच्यासोबतच्या करारांचा समावेश आहे.