डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

रायगडमध्ये ऑरिक औद्योगिक वसाहतीत इटालियन कंपन्यांसाठी विशेष सुविधा निर्माण होणार

भारत सरकार इटालियन कंपन्यांसाठी “होम अवे फ्रॉम होम” या संकल्पनेवर आधारित समर्पित औद्योगिक वसाहती विकसित करणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी इटली दौऱ्यादरम्यान ही माहिती दिली. राज्यात या वसाहतींसाठी रायगडमधलं दिघी आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक सिटीची निवड करण्यात आली आहे.

 

छत्रपती संभाजीनगरमधील ऑरिक सिटीचा विस्तार सुमारे आठ हजार एकरांपर्यंत करण्याचा प्रस्ताव सरकारने तयार केला असून, या विस्तारीकरणात इटालियन कंपन्यांसाठी स्वतंत्र क्लस्टरची रचना केली जाणार आहे.

 

या वसाहतीत इटालियन कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सर्व सुविधा दिल्या जाणार असून, यामध्ये इटालियन अभ्यासक्रमावर आधारित शाळा तसंच महाविद्यालयं, इटलीतील आरोग्य विमा योजनांना स्वीकारणारी हॉस्पिटल्स, तसंच एकत्रितपणे काम आणि निवास आदी सुविधांचा समावेश असेल. इथे होणाऱ्या गुंतवणुकीमुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळतील तसंच पायाभूत सुविधा अधिक विकसित होतील, असा विश्वास वर्तवला जात आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा