काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली मतदार अधिकार यात्रा बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या देव इथं पोहोचली. औरंगाबाद इथल्या सूर्य मंदिरात जाऊन गांधी यांनी दर्शन घेतलं. यात्रेचा आज दुसरा दिवस आहे.
बिहारमधील मतदार यादीत केल्या जाणाऱ्या विशेष पुनरिक्षण प्रक्रियेला विरोध करण्यासाठी मतदार अधिकार यात्रा काढली आहे. १६ दिवस चालणाऱ्या या यात्रेत इंडिया आघाडीतील विविध पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. ही यात्रा २० हून अधिक जिल्ह्यांत जाणार असून १ सप्टेंबर रोजी पटना इथल्या गांधी मैदानात समारोप सभा होईल.
दरम्यान, आज सकाळी राहुल गांधी यांनी औरंगाबादच्या अंबा, कुटुंबा,पातालगंगा आणि अन्य भागांचा दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत बिहार विधानसभेतील विरोधी पक्ष नेते तेजस्वी प्रसाद यादव, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राजेश राम आणि विकासशील इन्सान पार्टीचे प्रमुख मुकेश सहानी उपस्थित होते. राहुल गांधी आज गया इथं जाणार असून तिथं ते सभा घेणार आहेत. आहेत. त्याआधी ते गुरारू, बगडीहा, दाऊदनगर आणि पंचनापूर इथंही जाणार आहेत.