राहुल गांधी यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

झारखंडमधल्या चाईबासा इथल्या न्यायालयानं २०१८ मधील मानहानीच्या प्रकरणात लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. राहुल गांधी यांनी २६ जूनला कोर्टात स्वतः हजर राहावं असे निर्देश न्यायालयानं दिले आहे. २०१८ मध्ये आपल्या पक्षाच्या एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी भाजपाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या सुनावणीला वैयक्तिक उपस्थितीतून सूट मिळावी अशी विनंती राहुल गांधी यांच्या वकिलांनी केली होती, मात्र न्यायालयानं ती फेटाळून लावली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.