July 3, 2025 2:55 PM

printer

केंद्र सरकारला शेतकऱ्यांची पर्वा नाही- राहुल गांधी

 महाराष्ट्रात गेल्या तीन महिन्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे ७६७ कुटुंबं उद्ध्वस्त झाली असून, यानंतरही केंद्र सरकारला त्यांची पर्वा नाही, शेतकरी दररोज कर्जाच्या ओझ्याखाली दडपला जात असूनही सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे, अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या तीन महिन्यात राज्यात ७६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती विधिमंडळाच्या चालू पावसाळी अधिवेशनात विधानसेभत दिली होती. त्यावरून राहूल गांधी यांनी ट्विटरवरून ही टीका केली आहे. 

 

दरम्यान, राहुल गांधी यांनी त्यांच्या पक्षाच्या सत्ताकाळातल्या अपयशाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप भाजपानं या टीकेच्या प्रत्युत्तरात केला आहे. यासंदर्भात त्यांनी १९९९ चे २०१४ चा तपशील सामायिक केला असून, या काळात ५५ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, यासाठी जबाबदार कोण असा सवालही केला आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.