स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल कुठलेही अवमानकारक वक्तव्य करु नका अशी ताकीद सर्वोच्च न्यायालयानं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना दिली आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान अकोल्यात झालेल्या सभेत त्यांनी सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.
त्यासंदर्भात न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि मनमोहन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. यापुढे स्वातंत्र्य सैनिकांबद्दल अशाप्रकारची वक्तव्य केली तर न्यायालय स्वतःहून कारवाई करेल, अशा इशाराही खंडपीठानं दिला. यापुढे अशी वक्तव्य करणार नाही, असं आश्वासन राहुल गांधी यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी न्यायालयाला दिलं. त्यानंतर न्यायालयानं गांधी यांना बजावलेल्या समन्सला स्थगिती दिली.