काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले. मतदार नोंदणी, देशभरातल्या संपूर्ण मतदान प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा दावा गांधी यांनी आज घेतलेल्या आपल्या पत्रकार परिषेदत केला. निवडणुकीआधी काँग्रेस समर्थकांची नावं मतदार याद्यांमधून एकगठ्ठा हटवल्याचं ही त्यांनी यावेळी सांगितलं.
कर्नाटकच्या आलंदा विधानसभा मतदार संघात २०२३ मध्ये ६ हजार १८ मतदारांच्या नावं बनावट अर्ज करून हटवल्याचं गांधी यांनी सांगितलं. महाराष्ट्रातल्या राजुरा मतदार संघातही बनावट मतदारांची नावं ऑटोमेटेड सॉफ्टवेअरचा वापर करत समाविष्ट केल्याचंही त्यांनी सांगितलं. या सर्व प्रकरणांकडे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार कानाडोळा करत असून त्यांचं हे वर्तन लोकशाहीसाठी घातक असल्याचं गांधी यांनी सांगितलं.