लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली बिहारमधल्या सासाराम इथून मतदान हक्क यात्रेला उद्यापासून सुरुवात होत आहे. १६ दिवस चालणारी ही यात्रा बिहारमधल्या २५ जिल्ह्यांमधून जाईल, अशी माहिती काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह यांनी दिली. यात राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह इंडिया आघाडीचे नेते सहभागी होतील. मतदारयाद्यांच्या सखोल पुनरिक्षणात झालेल्या त्रुटी या यात्रेदरम्यान लोकांसमोर उघड केल्या जातील असं अखिलेश प्रसाद सिंह यांनी सांगितलं.
Site Admin | August 16, 2025 7:55 PM | Rahul Gandhi
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली बिहारमधे मतदान हक्क यात्रेला उद्यापासून सुरुवात
