लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी येत्या ६ तारखेला नागपूरात संविधान संमेलनाला उपस्थित राहणार

भारताचे संविधान हेच सर्वोच्च आहे. मनुस्मृती विरोधात काँग्रेसची लढाई सुरुच आहे. त्यामुळे संविधान वाचवण्यासाठी लढा उभारणे काळाची गरज आहे. हा लढा अधिक बुलंद करण्यासाठी विदर्भातील सामाजिक संस्थानी नागपूर इथे येत्या ६ तारखेला संविधान संमेलन आयोजित करण्यात आलं असून या संमेलनाला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित राहणार असल्याची माहिती विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्रातील विविध सामाजिक संघटना कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मान्यवर यात आपले विचार मांडणार आहेत. या कार्यक्रमाला राजकीय स्वरूप नाही. आदर्श आचारसंहितेचं पालन करूनच कार्यक्रम होणार आहे, असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे.