रापा म्हणजेच रेडिओ अँड टेलिव्हिजन प्रोफेशनल्स असोसिएशन ट्रस्ट या संस्थेतर्फे रेडिओ आणि टीव्ही क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना १८ विविध विभागांमधले पुरस्कार प्रदान करण्यात आले. चित्रपट निर्माते किरण शांताराम, ऑस्कर अकादमीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषदेचे सदस्य उज्ज्वल निरगुडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी, लोकसेवेचा संदेश या विभागात आकाशवाणीच्या कार्यक्रम अधिकारी नेहा खरे यांचा, तर रेडिओ जिंगल या प्रकारात उद्घोषक दिनेश अडावदकर यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तर दूरदर्शन सह्याद्रीला सर्वोत्तम मराठी यूट्यूब वाहिनी हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.