राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गणेशोत्सवापूर्वी अहमदनगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीची कामं पूर्ण करावी – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गणेशोत्सवापूर्वी अहमदनगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीची कामं पूर्ण करावी असे निर्देश महसूल मंत्री आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिले. मनमाड रस्त्याबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची कामं झालेली नाहीत त्यामुळे खड्डे बुजवण्यासाठी आणि थांबलेलं काम पूर्ण करण्यासाठी एकापेक्षा अधिक संस्था नियुक्त करून तातडीने महामार्गाची दुरुस्ती करावी असे निर्देश विखे पाटील यांनी दिल आहेत.