December 23, 2025 10:22 AM | Rabicrop

printer

देशभरात ५ कोटी ८० लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी

देशात यावर्षी आतापर्यंत ५ कोटी ८० लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधी झालेल्या पेरण्याच्या तुलनेत ही संख्या सुमारे आठ लाख हेक्टरने अधिक आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं १९ डिसेंबरपर्यंतच्या रब्बी पिकांखालील क्षेत्राच्या प्रगतीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. गव्हाखालील क्षेत्र ३०१ लाख हेक्टरपेक्षा जास्त नोंदवले गेले आहे. ते गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील ३०० लाख हेक्टरपेक्षा अधिक आहे. कडधान्याखालील क्षेत्र १२६ लाख हेक्टरपेक्षा जास्त आहे, तर भाताच्या क्षेत्रात १३ लाख हेक्टरपेक्षा जास्त लक्षणीय वाढ झाली आहे, असंही या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.