डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 22, 2024 1:49 PM | Modi | PM Modi

printer

क्वाड शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांनी सर्व सदस्य देशांच्या प्रमुख नेत्यांच्या घेतल्या भेटी

क्वाड शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांनी सर्व सदस्य देशांच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची त्यांनी बायडेन यांच्या डेलावेर इथल्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी भारत आणि अमेरिकेतल्या सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठीच्या नव नव्या संधींवर चर्चा केली. ही चर्चा अत्यंत फलदायी ठरल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून सांगितलं. जपानचे प्रधानमंत्री फुमियो कीशीदा आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानिज यांच्याशी देखील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी द्विपक्षीय चर्चा केली.