वॉशिंग्टन डीसी मधे झालेल्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीनंतर दिलेल्या संयुक्त निवेदनात २२ एप्रिलला जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. त्यासोबतचं संयुक्त राष्ट्रांच्या सर्व सदस्य राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार आणि संबंधित सुरक्षा परिषदेच्या ठरावाच्या अधिनियमानुसार सक्रियपणे सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं. क्वाडनं आर्थिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स इनिशिएटिव्ह सुरू केलं असून त्याचा उद्देश आर्थिक सुरक्षा आणि स्थिरता आहे. सामायिक हवाई क्षमता मजबूत करण्यासाठी आणि संयुक्त लॉजिस्टिक सामर्थ्याचा लाभ घेण्यासाठी पहिल्या क्वाड इंडो-पॅसिफिक लॉजिस्टिक्स नेटवर्क फील्ड प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. सदस्य राष्ट्रांनी पूर्व चीन समुद्र आणि दक्षिण चीन समुद्रातल्या परिस्थितीबद्दल गंभीर चिंता व्यक्त करताना समुद्री विवाद शांतपणे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अनुरूप सोडवण्याचं आवाहन केलं. तसचं उत्तर कोरियाच्या क्रिप्टोकरन्सीची चोरी, बेकायदेशीर शस्त्र आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र वापराच्या कार्यक्रमांबद्दल चिंता व्यक्त केली. या निवेदनावर परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर, अमेरिकेचे सचिव मार्को रुबिओ, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वॉग आणि जपानचे टाकेशी इवाया यांनी सहमती व्यक्त केली.
Site Admin | July 2, 2025 1:52 PM | Pahalgam attack | Quad
क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत पहलगाम हल्ल्याचा निषेध
