क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधुने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तिने जपानच्या तोमोको मियाजाकी हिचा २१-८, २१-१३ असा पराभव केला.
या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत जाण्याची सिंधुची ही चौथी वेळ आहे. उपांत्य फेरीत सिंधुचा सामना चीन किंवा जपानच्या खेळाडूशी होईल. त्याआधी भारताच्या आयुष शेट्टीला चीनच्या शी युकी याच्याकडून पराभव पत्करावा लागला.