July 30, 2024 2:42 PM

printer

आजारांना प्रतिबंध करणाऱ्या उपायांवर अधिक भर द्या- डॉ. अरुण गोयल

आजाराचं निदान आणि त्यासाठीच्या उपचारपद्धतींपेक्षा आजारांना प्रतिबंध करणाऱ्या उपायांवर अधिक भर द्यायला हवा असं आरोग्य सेवा महासंचालक डॉ. अरुण गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत आयोजित विविध वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यावसायिकांच्या बैठकीत बोलत होते.

 

डॉ. गोयल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आरोग्य सेवांचा धोरणात्मक प्रचार, साथीच्या आजारांचा प्रतिबंध त्याचप्रमाणे तबांखू आणि मद्याच्या सेवनावर प्रतिबंध लावण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.