बिहार, पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांमधून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी रालोआ सरकार वचनबद्ध आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. बिहारमधल्या पूर्णिया इथं पूर्णिया विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. राजद आणि काँग्रेसच्या कुशासनामुळे लोकांनी त्यांना सत्तेच्या बाहेर ठेवलं अशी टीका प्रधानमंत्र्यांनी यावेळी केली. जीएसटी सुधारणांचा उल्लेखही त्यांनी केला. नव्या कररचनेमुळे साबण, पेस्ट, किराणा, कपडे अशा दैनंदिन उपयोगाच्या वस्तू स्वस्त झाल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं. रालोआ सरकार देशातल्या सर्व कुटुंबांना घर देण्यासाठी प्रयत्न करत असून आतापर्यंत ४ कोटी कुटुंबांना हक्काचं घर मिळालं आहे, असं मोदी यांनी सांगितलं.
तत्पूर्वी, प्रधानमंत्र्यांनी ४० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. राष्ट्रीय मखाना बोर्डाचं लोकार्पणही त्यांनी केलं.