डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पुरी इथं झालेल्या चेंगराचेंगरी दुर्घटनेचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

ओडिशातील जगन्नाथ यात्रेदरम्यान पुरी इथं श्री गुंडीचा मंदिराजवळ काल सकाळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय प्रशासकीय चौकशीचे आदेश ओडिशा सरकारने दिले आहेत. यामध्ये दोन महिलांसह तीन भाविकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले आहेत. ओडिशाच्या विकास विभागाच्या आयुक्त अनु गर्ग या घटनेची चौकशी करतील. ओडिशा सरकारने मृतांच्या नातेवाईकांना पंचवीस लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

 

काल पहाटे साडेचारच्या दरम्यान भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या रथांवर, नंदीघोश, तालध्वज आणि देवदलना हे विधी सुरु असताना ही दुर्घटना घडली. या यात्रेसाठी मोठ्या संख्येने दरवर्षी हजारो भाविक पुरी इथं जमतात. या पार्श्वभूमीवर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी राज्य सरकारने पुरीचे जिल्हा दंडाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांची बदली केली असून इतर दोन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री मोहनचरण माझी यांनी भाविकांच्या मृत्यूबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा