डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 12, 2025 7:01 PM | Ministry of Railways

printer

पंजाबमधल्या फिरोजपूर-पट्टी रेल्वे लिंक प्रकल्पाला मंजुरी

केंद्रसरकारने पंजाबमधल्या फिरोजपूर-पट्टी रेल्वे लिंक प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाची लांबी २५ किलोमीटर पेक्षा जास्त असून, तो पूर्ण झाल्यावर फिरोजपूर आणि अमृतसर दरम्यानचं  अंतर १९६ किलोमीटरवरून सुमारे १०० मीटर, इतकं कमी होईल. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी आज चंदीगड इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. 

 

या प्रकल्पासाठी एकूण ७६४ कोटी १९ लाख रुपये खर्च अपेक्षित असून, हा संपूर्ण खर्च रेल्वे करणार असल्याचं ते म्हणाले.  हा प्रकल्प केवळ धोरणात्मक आणि आर्थिक दृष्टया महत्वाचा नसून, तो पंजाबमधल्या ‘माळवा’ आणि ‘माझा’ या प्रदेशांना जोडणारा महत्वाचा दुवा ठरेल, तसंच यामुळे जवळजवळ अडीच लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील,  असं ते म्हणाले.