December 10, 2025 3:39 PM

printer

मेहुल चोकसीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी आरोपी हिरे व्यापारी मेहुल चोकसी याच्या प्रत्यार्पणाला आव्हान देणारी याचिका बेल्जियमच्या सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. यामुळे चोकसीच्या प्रत्यार्पणाच्या कारवाईतला अडथला दूर झाला आहे.

 

भारतात आपला छळ होईल असा दावा चोकसीने याचिकेत केला होता. मात्र इतर कैद्यांप्रमाणेच चोकसीलाही मानवाधिकार संरक्षण मिळेल आणि निःपक्षपाती सुनावणीची संधी मिळेल हा भारतीय यंत्रणांचा युक्तिवाद बेल्जियमच्या सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य मानला.