डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 10, 2025 9:14 AM

printer

प्रधानमंत्र्यांकडून पूरग्रस्त पंजाब आणि हिमाचल प्रदेशसाठी मदतनिधीची घोषणा

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल पूरग्रस्त पंजाब आणि हिमाचल प्रदेशचा दौरा केला आणि या भागाची हवाई पाहणी केली तसंच पूरामुळे बाधित झालेल्या नागरिकांशी संवाद साधला.

 

पूरग्रस्त पंजाबसाठी सोळाशे कोटी रुपयांची अतिरिक्त मदत जाहीर केली आहे. यापुर्वी जाहीर करण्यात आलेल्या १२ हजार कोटी रुपयांच्या मदतनिधी व्यतिरिक्त ही मदत असणार आहे. हिमाचल प्रदेशसाठी १५ हजार कोटी रुपयांची मदत प्रधानमंत्र्यांनी जाहीर केली. 

 

राज्य आपत्ती निवारण निधीचा दुसरा हप्ता आणि प्रधानमंत्र्यांनी किसान सन्मान निधी आगाऊ स्वरुपांत जारी केला जाईल. असंही त्यांनी सांगितलं.  तत्पूर्वी, पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंजाबमधील गुरुदासपूर इथं वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्यांनी आढावा बैठक घेतली. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणअंतर्गत पुराच्या पाण्यामुळे नुकसान झालेल्या घरांसाठी पंजाब सरकारनं प्रस्तावित केलेल्या विशेष गृह प्रकल्पाअंतर्गत निधी पुरवला जाईल तसंच समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत शाळांची उभारणी करण्यात येईल अशी माहिती आकाशवाणीच्या वार्ताहरानं दिली आहे.

 

हिमाचल प्रदेशमधील भुस्खलन, पूर आणि अतिमुसळधार पावसाने झालेल्या नुकासानीचा आढावा पंतप्रधानांनी कांगरा इथं घेतला. या आपत्तीत मृत्यू झालेल्यांच्या निकटवर्तीयांना दोन लाख आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.