हरयाणा पंजाबचं पाणी हिसकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांनी केला आहे. पंजाबमध्ये पाणीसाठा कमी असूनही माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्यांनी हरयाणाला आधीच ४ हजार क्युसेक पाणी दिलं आहे. मात्र, आता आपल्या राज्यात इतर राज्यांना देण्यासाठी पुरेसा पाणीसाठा नसल्याचं मान एका निवेदनाद्वारे म्हणाले. केंद्रीय रेल्वे आणि अन्न प्रक्रिया राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी मान यांच्यावर टीका केली आहे. एकिकडे देश पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा सामना करत असताना मान यांनी हरयाणाबरोबर पाण्यावरून वाद निर्माण करणं हे लज्जास्पद असल्याचं बिट्टू म्हणाले आहेत.
Site Admin | April 30, 2025 1:17 PM | Haryana | Punjab
हरयाणा पंजाबचं पाणी हिसकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा पंजाबचा आरोप
