डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

हेरगिरीच्या आरोपाखाली पंजाब आणि हरयाणातून तीघांना अटक

हेरगिरी करण्याचा प्रयत्न हाणून पाडत पंजाब पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. हे दोघं ऑपरेशन सिंदूर, भारतीय लष्करांच्या हालचाली, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमधली महत्त्वाची ठिकाणं यांची माहिती आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला देत होते, असं पोलीसांनी सांगितलं. आरोपींचे मोबाईल फोन तपासले असता त्यांनी गुप्त माहिती पाकिस्तानला पुरवल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी आरोपींकडून तीन मोबाईल आणि जिवंत काडतूसं जप्त केली आहेत. 

 

हरियाणामधल्या नुह जिल्ह्यातही पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली एक जणाला अटक करण्यात आली आहे. हा आरोपी भारतीय लष्कराची माहिती दिल्लीतल्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयाला व्हॉट्सऍपद्वारे पुरवत होता, असा त्याच्यावर आरोप आहे. पाकिस्तानी उच्चायुक्तालयातल्या दोन अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातल्या मुरादाबादमधून अटक केलेल्या आरोपीला आज लखनौ न्यायालयात हजर  करण्यात आलं. न्यायालयानं त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.