पंजाबमधे अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एकाला अटक

पंजाबमध्ये तरनतारन इथे अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एकाला पंजाब पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून १५ किलो हेरॉईन जप्त केलं आहे. आरोपी पाकिस्तान आणि अमेरिकेतल्या अंमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित आहे. त्याचं नाव हर्षप्रीत सिंग असं असून तो अमृतसरचा रहिवासी आहे. पंजाबच्या पाकिस्तान सीमेलगत असलेल्या भागात ड्रोनच्या माध्यमातून अंमली पदार्थांची तस्करी केली जाते. ही तस्करी हर्षप्रीत करत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पंजाब सरकारने युद्ध नशेयां विरुद्ध ही मोहीम सुरू केल्यानंतर अंमली पदार्थाची ही सर्वात मोठी खेप आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.