पंजाबमध्ये पोटनिवडणुकीत हस्तक्षेप केल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधीक्षक रवजोत कौर गरेवाल यांना निलंबित करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. पंजाबमधल्या तरन तारन मतदारसंघात ११ नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत गरेवाल हे आम आदमी पार्टीला मदत करण्यासाठी हस्तक्षेप करत असल्याची तक्रार शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर बादल यांनी केली होती. आम आदमी पार्टी निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी पोलिसांचा वापर करत असून पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळजबरी अटक केली जात असल्याचा आरोप अकाली दलानं केला आहे. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधीक्षकाला निलंबित करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
Site Admin | November 8, 2025 7:56 PM | Punjab By-elections
पंजाबमध्ये पोटनिवडणुकीत हस्तक्षेप केल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना निलंबनाचे आदेश