पंजाबमध्ये फाझिल्का इथे सीमा सुरक्षा दल आणि पंजाब पोलिसांच्या पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत दोन शस्त्रास्त्र तस्करांना अटक करण्यात आली. या तस्करांकडून २७ पिस्तुलं आणि ४७० जिवंत काडतुसं सापडली आहेत.
हे दोघेही सीमेपार शस्त्रांची तस्करी करत होते. ही शस्त्रं पाकिस्तानमधून एका परदेशी संघटनेमार्फत आणली गेली होती आणि पंजाबमधल्या गुन्हेगारी टोळ्यांना पुरवण्यात येणार होती, अशी माहिती पंजाब पोलिसांनी दिली आहे.