पंजाबमधे आलेल्या पुरामुळे नागरिकांना कालची रात्र घराच्या छतावर बसून काढावी लागली. पुरात मोठ्या प्रमाणात पिकांचंही नुकसान झाल्याचं प्रशासनानं सांगितलं.
होशियारपूर, जलंधर, कपूरथला, आनंदपूर साहिब, रोपर या जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. देशाच्या सीमेवरले सीमा सुरक्षा दलाचे अनेक तपासणी नाके ही पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. गरजू लोकांना आवश्यक मदत तात्काळ पोहोचवण्याची सूचना पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिल्या आहेत