पंजाबमधल्या १ कोटी ४१ लाख गरीब लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून मोफत अन्नधान्य मिळत राहणार असल्याचं केंद्रीय खाद्यान्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्पष्ट केलं आहे.
यांनी केंद्र सरकार पंजाबातल्या ५५ लाख गरीब नागरिकांना मोफत धान्य देणं बंद करणार असल्याच्या काल केलेल्या आरोपाला जोशी उत्तर देत होते. सर्वोच्च न्यायालयाने पंजाबला राज्यातल्या गरीब लाभार्थ्यांचे केवायसी अद्ययावत करण्याचे निर्देश दिले होते त्यानंतर केंद्राने यासाठी पंजाबला तीन वेळा मुदतवाढही दिली होती,असं जोशी यांनी स्पष्ट केलं.