May 30, 2025 1:13 PM | Punjab

printer

पंजाबमध्ये फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात ५ जणांचा मृत्यू, ३४ जखमी

पंजाबमध्ये, श्री मुक्तसर साहिब जिल्ह्यातल्या लांबी भागात काल रात्री उशिरा एका फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात किमान पाच जणांचा मृत्यू झाला आहे आणि ३४ जण जखमी झाले आहेत. पोलिस उपअधीक्षक जसपाल सिंह यांनी आकाशवाणीला ही माहिती दिली. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे आणि ते विविध रुग्णालयात उपचार घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं. स्फोटामागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सध्या बचावकार्य थांबवण्यात आलं आहे, बहुतेक कारखान्यातील कामगार उत्तर प्रदेश आणि बिहारमधले स्थलांतरित असल्याचं, आमच्या प्रतिनिधीनं सांगितलं.