पुण्यातल्या कोरेगाव पार्क आणि बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. या व्यवहारातली कुलमुखत्यारपत्रधारक शीतल तेजवानी परदेशात पळून गेल्याची चर्चा असली तरी त्याला पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही. या प्रकरणांतली कागदपत्रं संबंधित शासकीय विभागाकडून मागवण्यात आली आहेत. त्याची पडताळणी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे, असं सूत्रांनी सांगितलं.
Site Admin | November 9, 2025 3:25 PM | Pune
पुण्यातल्या कोरेगाव पार्क आणि बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे