डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

May 25, 2025 3:27 PM

printer

पुण्यात पाणी साचणार नसल्याची दक्षता घेण्याच्या सूचना

यंदा ११७ टक्के पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवल्याच्या पार्श्वभूमीवर  ज्या दिवशी अतिरिक्त पाऊस होईल, त्या दिवशी पुणे शहरात कुठंही पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्या अशा सूचना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कोथरुड मतदारसंघातल्या पावसाळापूर्व कामांचा आढावा पाटील यांनी घेतला. त्या बैठकीत ते बोलत होते. पावसामुळे निर्माण होणाऱ्या समस्या जलदगतीने सोडविण्यासाठी कोथरुड मतदारसंघात एक नोडल अधिकारी नेमावा, अशी सूचना पाटील यांनी यावेळी केली.