पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पवार कुटुंबियांचे पक्ष पिछाडीवर

पुणे महानगरपालिकेच्या एकंदर १६५ जागांपैकी भाजपा ५७, राष्ट्रवादी काँग्रेस १२, काँग्रेस १०, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ३ जागांवर आघाडीवर आहेत. २ जागांवरचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

 

राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांची युती असलेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजपानं आघाडी घेतली आहे. १२८ जागांच्या महानगरपालिकेत भाजपा ७०, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती ४० जागांवर आघाडीवर आहे.

 

१०२ सदस्यांच्या सोलापूर महानगरपालिकेत भाजपा ६०, तर ८१ सदस्यांच्या कोल्हापूर महानगरपालिकेत ६६ जागांचे निकाल स्पष्ट झाले आहेत. काँग्रेस २८, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एका जागेवर विजयी झाला आहे. भाजपानं १९, शिवसेनेनं १४, राष्ट्रवादी काँग्रेसनं ३ आणि जनसुराज्य पक्षानं १ जागा जिंकली आहे. 

 

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या ६८ जागांपैकी, राष्ट्रवादी २७, भाजपा २५, शिवसेना १०, काँग्रेस २, एमआयएम २, बसपा १ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एका जागेवर आघाडीवर आहे. एकंदर ५ जागांवर बिनविरोध निवडणूक झाली असून भाजपाचे ३ आणि राष्ट्रवादीचे २ उमेदवार विजयी झाले आहेत.

 

इचलकरंजी महानगरपालिकेच्या ६४ जागांपैकी भाजपा ४३, महाविकास आघाडी पुरस्कृत शिव-शाहू विकास आघाडी १७, शिवसेना ३, ठाकरेंची शिवसेना १, तर राष्ट्रवादी काँग्रेस १ जागेवर आघाडीवर आहे.

 

सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत ७८ पैकी २८ जागांवर भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस ९, काँग्रेस ८, शिवसेना १, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एका जागेवर आघाडीवर आहे.