पुण्यात भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस आमनेसामने

आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये राज्यात बहुतांश ठिकाणी महायुती म्हणून लढू, पुण्यात मात्र भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी मैत्रिपूर्ण लढत होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज दिली. पुण्यात त्यांनी वार्ताहरांना संबोधित केलं.

 

आपल्या सरकारनं केलेलं काम पाहता जनता या निवडणुकीत महायुतीलाच कौल देईल, असा विश्वास फडनवीस यांनी व्यक्त केला. मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आले आणि काँग्रेस त्यांच्यासोबत गेली तरीही आपल्याला कोणताही फटका बसणार नाही, मुंबईकर महायुतीलाच निवडून देतील, असंही ते म्हणाले. मतदार याद्यांमध्ये अनेक ठिकाणी घोळ आहेत हे आपणही दाखवलं, पण म्हणून निवडणुकाच घ्यायच्या नाहीत, असं करता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयानं आदेश देऊनही काही ना काही कारणानं निवडणुका पुढे ढकलायचा प्रयत्न करणं योग्य नाही, असंही फडनवीस यांनी सांगितलं.