पुण्यातल्या धोकादायक वाडे तसंच इमारतींना रिकामी करण्याची नोटीस

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगर पालिकेने शहराच्या मध्यवर्ती भागातल्या धोकादायक वाडे तसंच इमारतींना रिकामी करण्याची नोटीस दिली आहे. जीवितहानी होऊ नये यासाठी या वाड्यांचं पाणी आणि वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. वाडे रिकामी करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या बांधकाम विभागाने दिली आहे. बांधकाम विभागाने यंदा ११६ धोकादायक वाड्यांना नोटिसा बजावली असून त्यापैकी ७६ वाडे रिकामी करण्यात आले आहेत.