December 7, 2025 6:49 PM | Pune Marathon

printer

Pune Marathon: महिला गटात भारताची साक्षी जडिया, तर पुरुष गटात इथियोपियाचा टेरेफे हैमानोत विजयी

पुणे मॅरेथॉनमध्ये पूर्ण मॅरेथॉन महिला गटात भारताची साक्षी जडिया हिनं विजेतेपद पटकावलं. आज झालेल्या या स्पर्धेत तिनं २ तास, ३९ मिनिटं आणि ३७ सेकंद इतक्या वेळेत ही शर्यत पूर्ण केली. दुसरा आणि तिसरा क्रमांक इथियोपियाच्या धावपटूंनी पटकावला. 

 

पूर्ण मॅरेथॉनच्या पुरुष गटात इथियोपियाचा टेरेफे हैमानोत यानं २ तास, २० मिनिटं, ८ सेकंदांत शर्यत पूर्ण करून जेतेपद मिळवलं. दुसरा क्रमांक इथियोपियाच्या धावपटूनं मिळवला, तर भारताचा त्रिथा पुन तिसऱ्या क्रमांकावर राहिला. 

 

अर्ध मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात भारताचा सचिन यादव यानं पहिला, राज तिवारी यानं दुसरा आणि मुकेश कुमार यानं तिसरा क्रमांक मिळवला, तर महिलांच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये भारती हिनं पहिलं आणि रविना गायकवाड हिनं दुसरं स्थान मिळवलं. याशिवाय, १० किलोमीटर, ५ किलोमीटर आणि व्हिलचेअर स्पर्धाही उत्साहात पार पडली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.