पुणे – माणगाव मार्गावर ताम्हिणी घाटात झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून दोन जण बेपत्ता आहे. परवा रात्री ही घटना घडलेल्या या अपघाताची माहिती आज समोर आली.
चालकाचे नियंत्रण सुटल्यानं गाडी दरीत कोसळली. या वाहनातल्या तरुणांशी संपर्क होत नसल्यानं त्याच्या पालकांनी शोध सुरू केल्यावर हा अपघात झाल्याचं लक्षात आलं. पोलिस ड्रोनच्या मदतीनं मृतांचा शोध घेत आहेत.