जमीन घोटाळ्यात पार्थ पवार यांना वाचवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे का? – मुंबई उच्च न्यायालय

पुण्यातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचं नाव एफआयआरमधे न नोंदवता इतर व्यक्तींची चौकशी करत पोलीस पार्थ पवार यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने विचारला आहे. या प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानी यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावरील सुुनावणी न्यायाधीश न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या एकल पीठासमोर झाली, त्यावेळी न्यायालयानं हा प्रश्न विचारला. यावर पोलीस कायद्यानुसार आवश्यक कारवाई करतील, असं सरकारी वकील मानकुंवर देशमुख यांनी न्यायालयाला सांगितलं. 

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांना वार्ताहरांनी याबद्दल विचारलं असता तपास करून न्यायालयात योग्य उत्तर दाखल करण्यात येईल, असं सांगितलं.