डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

पुण्यात ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’ या आजाराचे २४ रुग्ण, प्रशासन ॲक्शन मोडवर

पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिका क्षेत्रात गेल्या दोन आठवड्यांपासून अचानक जीबीएस, अर्थात ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’ या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. जीबीएस हा चेतासंस्थेशी संबंधित दुर्मिळ आजार आहे. पुण्यातला सिंहगड रस्ता, धायरी, नऱ्हे, विश्रांतवाडी, पर्वती, कसबा, कोथरूडसह उपनगर आणि ग्रामीण भागात या आजाराची लागण झालेले रुग्ण आढळून येत आहेत. २४ रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी काहीजण अतिदक्षता विभागात असून दोन कृत्रिम श्‍वसोच्‍छवास प्रणालीवर आहेत. 

 

या आजाराचं गांभिर्य लक्षात घेता त्यामुळे पालिका प्रशासन आणि राज्य सरकारनं ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पावलं उचलावीत, अशी अपेक्षा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. 

 

दरम्यान, रुग्ण आढळले आहेत त्या भागात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण केलं जात असून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.  या आजाराचं विश्लेषण करण्यासाठी नऊ जणांची समिती नेमली आहे. खबरदारी म्हणून नागरिकांनी पाणी उकळून प्यावं, असं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.