फुले वाडा, सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी प्रशासकीय मान्यता

पुण्यातल्या महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन तसेच रहिवाशांचं इतर ठिकाणी पुनर्वसन करायला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. या कामांसाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला असून प्रशासकीय मान्यता मिळाल्यानं आता स्मारक विस्तारीकरणाला गती मिळणार आहे.