पुण्यात नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातात ८ जणांचा होरपळून मृत्यू झाला. पुलावर गाड्यांची एकमेकांना धडक झाल्यानंतर दोन कंटेनरनी पेट घेतला. यामध्ये एक चारचाकी वाहन अडकलं आणि त्यातल्या प्रवाशांचा मृत्यू झाला. यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबांना पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
Site Admin | November 14, 2025 3:22 PM | Pune Accident
पुण्यात नवले पुलावर झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू