डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 11, 2025 7:20 PM | Pune Accident

printer

पुण्यात वाहन दरीत कोसळून ८ महिलांचा मृत्यू, २९ जखमी

पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात पोईट इथं आज कुंडेश्वराच्या दर्शनाला चाललेल्या महिला भाविकांचं वाहन दरीत कोसळून ८ जणींचा जागीच मृत्यू झाला, तर २९ जण जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीनं पोलिसांनी जखमींना चांडोली ग्रामीण रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात दाखल केलं आहे. अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. 

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदतही त्यांनी जाहीर केली आहे. 

 

राज्य सरकारतर्फे मृतांच्या कुटुंबांना चार लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी जाहीर केली आहे. जखमींना आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत आणि उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा