अनधिकृत गौण खनिज उत्खननप्रकरणी राज्य सरकारनं ४ तहसिलदार, ४ मंडळ अधिकारी आणि २ तलाठ्यांना निलंबित केलं आहे. पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यात वनीकरणासाठी राखीव असलेल्या क्षेत्रातून ९० हजार ब्रास अनधिकृत गौण खनिजाच्या उत्खनन प्रकरणी ही कारवाई झाली आहे. आमदार सुनील शेळके यांनी काल ही लक्षवेधी विधानसभेत मांडली होती.
राज्यभरातल्या अवैध उत्खननाला लगाम लावण्यासाठी प्रत्येक जिल्हा, तालुका आणि गावाचा ईटीएस सर्वे सुरू झाला आहे. यामुळे किती परवानग्या दिल्या आणि किती अवैध उत्खनन झाले, याची माहिती मिळेल आणि त्यानुसार दोषींवर कारवाई केली जाईल, असं आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे.