आज ‘सार्वजनिक प्रसारण सेवा’ दिवस

आज सार्वजनिक प्रसारण सेवा दिवस आहे. १९४७ मधे फाळणीनंतर भारतात आलेल्या विस्थापितांना याच दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी  ऑल इंडिया रेडियोवरुन संबोधित केलं होतं. या ऐतिहासिक भाषणाची आठवण म्हणून १२ नोव्हेंबर हा दिवस सार्वजनिक प्रसारण सेवा दिन म्हणून घोषित करण्यात आला.