डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

आर्थिक फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रिय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाची जनजागृती मोहीम

देशातल्या आर्थिक फसवणुकीच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन केंद्रिय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ अर्थात सीबीआयसीनं विविध माध्यमातून जनजागृती मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत अशा फसवणुकीच्या घटनांपासून सावध राहण्यासाठी वर्तमानपत्रं, मोबाईल संदेश, इ-मेल्स आणि समाजमाध्यमांद्वारे नागरिकांना सूचना देण्यात येत आहेत. सीमाशुल्क अधिकारी असल्याचं सांगून प्रामुख्यानं दूरध्वनी करुन किंवा एसएमएसच्या माध्यमातून लोकांना शिक्षेची भिती दाखवून त्यांच्या खात्यातून पैसे काढण्याचे प्रकार घडत आहेत. लोकांनी अशा दूरध्वनी अथवा एसएमएसकडे लक्ष देऊ नये, स्वतःची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवावी, असे दूरध्वनी करणाऱ्यांबाबत माहिती देऊन त्यांची तक्रार करावी आणि सतर्क राहावं असं आवाहन सीबीआयसी नं केलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.