डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मालवणजवळ राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या निषेध मोर्चादरम्यान तणाव

मालवण राजकोट इथं कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी आज तिथं गेलेले शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आणि भाजपा नेते नारायण राणे यांच्या समर्थकांनी एकमेकांवर दगडफेक केली. यात एक पोलीस आणि एक महिला  असे दोघे जखमी झाले. 

आज महाविकास आघाडीनं मालवण बंदची हाक दिली होती, त्याला मालवण मध्ये शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. मालवणची पूर्ण बाजारपेठ आज बंद होती. महाविकास आघाडीचा मोर्चाला सकाळी सुरु झाला. या मोर्च्यात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि अंबादास दानवे, तसंच आदित्य ठाकरे, जयंत पाटील हे सहभागी झाले होते. महाविकास आघाडीचे पदाधिकारी, आणि भाजपा नेते निलेश राणे तसंच त्यांचे समर्थक राजकोट इथं एकमेकांसमोर येताच दोन्ही बाजूकडून दगडफेक सुरू झाली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. पण मालवणमध्ये तणावपूर्ण वातावरण असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.